बेळगाव

बेळगाव : ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार

backup backup

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : सायकलवरून घरी निघालेल्या शाळकरी मुलाला मालवाहू ट्रक टिप्परने धडक दिल्याने मुलगा जागीच ठार झाला. प्रवीण महादेव शिंदे (वय १३, रा. रेल्वे फाटकाजवळ अनगोळ) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी पाचच्या सुमारास भाग्यनगर चौथ्या क्रॉस जवळ हा अपघात घडला. यामुळे शहरातील अवजड वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाळकरी मुलगा सायकलीवरून घरी निघाला होता. यावेळी भरधाव आलेल्या टिप्परने त्याला उडवले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. घटनास्थळी जमावाने मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी टिप्परसह त्याला ताब्यात घेतले आहे. शाळकरी मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलिसात नोंद झाली असून पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर तपास करीत आहेत.

बेदरकार अवजड वाहने

तीन महिन्यांपूर्वी कॅम्पमधील फिश मार्केट रोडवर अपघात होऊन शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. यानंतर कॅम्प परिसरातील अवजड वाहने पोलिसांनी काही दिवस थांबवली होती. परंतु, सध्या ती वाहने पुन्हा सुरू झाली आहेत. एखादा अपघात घडला की वाहतूक पोलीस तेवढ्यापुरते जागे होतात. परंतु, पुन्हा या बेदरकार वाहनांचा शाळकरी मुलांसह बेळगाव वासियांना धोका कायम आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT