निपाणीतील दोन तरुण काळम्मावाडी धरणाच्या डोहात बुडाले  Pudhari Photo
बेळगाव

निपाणीतील २ तरुण काळम्मावाडी धरणाच्या डोहात बुडाले; शोध सुरू

निपाणीतील दोन तरुण काळम्मावाडी धरणाच्या डोहात बुडाले

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : पुढारी वृत्तसेवा

आपल्या मित्रासमवेत पर्यटनासाठी गेलेल्या शहराबाहेरील आंदोलननगर, निपाणी येथील दोन तरुण डोहात बुडाल्याची घटना आज (सोमवार) दुपारी घडली. दरम्यान बुडालेल्‍या दोघा तरुणांचा पोलिस प्रशासनासह जीवरक्षक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध सुरू आहे. प्रतीक संजय पाटील (वय २२) व गणेश चंद्रकांत कदम (वय १८) अशी बुडालेल्‍या तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे आंदोलननगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

निपाणी व परिसरातून एकूण 13 जण पर्यटनासाठी सोमवारी सकाळी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्स वाहनातून गेले होते. दरम्यान काळम्मावाडी धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात प्रतीक व गणेश हे दोघे बुडाले. यावेळी बुडणाऱ्या गणेशला वाचवण्यासाठी प्रतीक हा धावला असता दोघांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. ही घटनाा समजताच इतर सहकार्यांनी आरडाओरड केली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही पाण्यातच बुडाले.

दरम्यान घटनेची माहिती समजतात निपाणी येथून टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकु पाटील, वसंत धारव, संदीप इंगवले सामाजिक कार्यकर्ते विनोद बल्लारी, रवींद्र इंगवले, बाळू शिंदे, रणजीत मगदूम, तुकाराम सुतार, विजय सुतार, अनिल श्रीखंडे, नितीन उपाळे यांच्यासह आंदोलननगर व परिसरातील नागरिक, कुटुंबीय व नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले.

यावेळी स्थानिक पाणबुड्यांना अपयश आल्याने कोल्हापूर येथील जीवरक्षकांना पाचारण करण्यात आले आहे. बुडालेल्या दोघांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरू असल्याची माहिती घटनास्थळी गेलेल्या परिसरातील नागरिकांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT