Stock Market | वेध शेअर बाजाराचा : ऐतिहासिक उच्चांकावर बाजार!

बाजारातील तेजीमागे 'ही' आहेत कारणे
वेध शेअर बाजाराचा : ऐतिहासिक उच्चांकावर बाजार !
वेध शेअर बाजाराचा : ऐतिहासिक उच्चांकावर बाजार !file photo
भरत साळेखे (संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.)

निफ्टी 50 निर्देशांक 24,000 चा महत्त्वाचा टप्पा याच महिन्यात पार करेल, असे मागील सोमवारच्या लेखात म्हटले होते आणि गंमत पाहा, 27 जून रोजी म्हणजे जून महिन्यात अखेरच्या आठवड्यात निफ्टी 24,174 हा आतापर्यंतचा सार्वकालिक उच्चांक नोंदवला. गुरुवार दिनांक 26 जून रोजीच निफ्टीने 24,000 चा टप्पा पार केला होता. सेन्सेक्सनेही गुरुवारी 79,000 चा टप्पा पार आणि शुक्रवारी 79,671.58 चा उच्चांक नोंदवला. बँक निफ्टीने 53,180.75 चा उच्चांक नोंदवला.

निफ्टी मिड कॅप इंडेक्स आणि निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स यांनीही मागील आठवड्यात उच्चांक नोंदवले.

वेध शेअर बाजाराचा : ऐतिहासिक उच्चांकावर बाजार !
वेध शेअर बाजाराचा : निवडणुकीच्या धामधुमीतही बाजारात तेजी

2024 हे कॅलेंडर वर्ष सुरू झाले तेव्हा खूपशा बाजार तज्ज्ञांनी सांगितले होते की, चालू वर्षामध्ये गुंतवणूकदारांनी फार मोठ्या परताव्याची अपेक्षा बाजाराकडून करू नये. परंतु, पहिल्या सहा महिन्यांतच निफ्टीने साडे दहा टक्के परतावा दिला आहे. इतकेच नाही तर या सहा महिन्यांत निफ्टीने आतापर्यंत 25 वेळा उच्चांक नोंदविला आहे. तेजीची ही गती इतकी आहे की, 23,000 पासून 24,000 पर्यंतचा प्रवास निफ्टीने केवळ 23 दिवसांत पूर्ण केला. (23 Trading Sessions) याउलट 22,000 पासनू 23,000 पर्यंत जाण्यासाठी बाजाराला 88 दिवस लागले होते.

या अचंबित करणार्‍या तेजीमागचे कारण काय? तर, FII, DII आणि Retail Investors या तिन्ही मार्केट पार्टीसिंपटनी केलेली भरघोस खरेदी! 10 जून ते 26 जूनदरम्यानच्या 12 सेशन्समध्ये FIIS नी रु. 32,087 कोटींची खरेदी केली, तर याच कालावधीत DIIS नी रु. 20,002 कोटींची खरेदी केली. एक्झिट पोल्सच्या दिवशी Retail Investors नी रु. 21,179 कोटींची खरेदी केली. अशी चौफेर खरेदी झाल्यावर बाजाराने उच्चांक नोंदवला नाही तरच नवल!

वेध शेअर बाजाराचा : ऐतिहासिक उच्चांकावर बाजार !
वेध शेअर बाजाराचा : सरकारला डिव्हिडंड; गुंतवणूकदार मालामाल!

या सर्वकष तेजीमागे खालील कारणे आहेत.

1) निवडणुकीनंतरचे राजकीय स्थैर्य

2) Value Blue Chips मधील खरेदी.

3) केंद्रीय अर्थसंकल्पाकडून भरीव अपेक्षा.

4) बहुतेक कंपन्यांचे चांगले आर्थिक निकाल, जीडीपी वाढ दर, चालू खात्यातील रोकडता.

5) MSCI, Emerging Markets मधील भारताचे वाढलेले योगदान.

आता थोडे ज्या दोन बातम्यांनी म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले त्यांच्याविषयी!

वेध शेअर बाजाराचा : ऐतिहासिक उच्चांकावर बाजार !
वेध शेअर बाजाराचा : ऐतिहासिक उच्चांकावर बाजार !admin

Retail Investors हा शेअर बाजारात असा विषय आहे. ज्याचा शोध घेणे किचकट काम आहे आणि त्यामुळे तो पूर्णपणे टाळणे सेबीसाठी अवघड काम आहे. अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडमधील फ्रंट रनिंग उघडकीस आले.

पाठोपाठ झी बिझनेस चॅनेलवरील पाच एक्स्पर्ट पॅनेलिस्टस् फ्रंट रनिंग करीत असल्याचे उघड झाले आणि क्वॉन्ट म्युच्युअल फंड हाऊसची चौकशी सुरू झाली आहे. गावोगावी कार्यालयांचे जाळे, विक्रेत्यांची टीम, आकर्षक जाहिराती यापैकी कशाचाही आधार न घेता ह्या फंड हाऊसचे सर्व फंडस् इतर सर्व फंडांपेक्षा कितीतरी उच्च परतावा देत आहेत. तो कशाच्या जोरावर, हे आता चौकशीअंती निष्पन्न होईल. दुसरे प्रकरण आहे. संजीव भसीन या असामीचे!

IIFL या ब्रोकिंग कंपनीचे एक्स्पर्ट म्हणून ते सर्व बिझनेस चॅनेल्सवर स्टॉक रिकमेंड करत फिरत असतात. एकेका दिवशी दहा-दहा, बारा-बारा शेअर्सची शिफारस ते करतात. शिवाय बोलण्यामध्ये हुकूमत इतकी की, सर्व शेअर्स जणू त्यांच्या शिफारशीचीच वाट पाहत आहेत. गंमत म्हणजे त्यांची चौकशी सुरू होताच त्यांच्याबाबतीत IIFL ने हात झटकून टाकले. याही प्रकरणात काय बाहेर येते ते पाहायचे.

वेध शेअर बाजाराचा : ऐतिहासिक उच्चांकावर बाजार !
वेध शेअर बाजाराचा | जीडीपीची कमाल, बाजारात धमाल

ज्या स्टॉक्समध्ये IIF आणि DII यांनी सध्याच्या रॅलीमध्ये धुवाँधार खरेदी केली आहे. त्यांची यादी नुकतीच Screener या वेब पोर्टलने प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी सर्वात जास्त खरेदी केलेले स्टॉक्स खालीलप्रमाणे आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news