NEET Reexam: नीट फेरपरीक्षेत एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण नाही

एनटीएकडून फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर
NEET UG NTA
राष्ट्रीय चाचणी संस्थेने १,५६३ विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांनी दिलेल्या फेरपरीक्षेचा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) सोमवारी जाहीर केला. या निकालानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांची सुधारित गुणवत्ता यादीही एनटीएने जारी केली आहे. फेरपरीक्षेच्या निकालात एकाही विद्यार्थ्याला ७२० पैकी ७२० गुण मिळविता आले नाहीत.

NEET UG NTA
NEET Exam Scam : नीट पेपरफुटी प्रकरणी CBI ची मोठी कारवाई

६ जुलैपासून समुपदेशन प्रक्रिया सुरु

आधीच्या परीक्षेत ६ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळाले होते. त्यापैकी ५ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली. मात्र, त्यातील एकालाही पैकीच्या पैकी गुण मिळवता आले नाहीत. त्यामुळे टॉपर्सची संख्या कमी झाली आहे. फेरपरीक्षेचा निकाल लागल्यामुळे आता ६ जुलैपासून समुपदेशन प्रक्रिया सुरु होणार आहे.

NEET UG NTA
नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्याध्यापक पठाण निलंबित

७५० विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेला गैरहजेरी

एनटीएने २३ जून रोजी घेतलेल्या फेरपरीक्षेला ८१३ विद्यार्थी बसले होते. ७५० विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेला गैरहजेरी लावली. चंदीगडमध्ये केवळ २ विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र देण्यात आले. मात्र, दोघेही फेरपरीक्षेला अनुपस्थित राहिले. छत्तीसगडचे बालोद आणि दंतेवाडा, गुजरातच्या सुरत, मेघालय, हरियाणाच्या बहादूरगड, चंदीगड अशा सहा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news