पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने शानदार प्रदर्शन करत झिम्बाब्वेचा पराभव केला. सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत विरोधी संघाला १८९ धावांमध्ये सर्वबाद केले. त्यानंतर झिम्बाने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी करत एकही गडी न गमवता सामन्यात विजय मिळवला. दरम्यान, मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार शिखर धवनने नव्या विक्रमाल गवसणी घातली आहे.(Shikhar Dhawan)
झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात शिखर धवनने चांगली फलंदाजी करत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. शिखर धवनने टीम इंडियासाठी ओपनिंग करताना 6500 धावा केल्या आहेत. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढे पाच फलंदाज असले तरी सध्या खेळत असलेल्या खेळाडूंपैकी फक्त रोहित शर्माच त्याच्या पुढे आहे. शिखर धवनने केवळ 153 सामन्यांमध्ये हे स्थान गाठले आहे. मोठी गोष्ट म्हणजे या सामन्यात शिखर धवननेही आपले अर्धशतक 75 चेंडूत पूर्ण केले. यावेळी त्याने पाच चौकार मारले. शिखर धवनच्या कारकिर्दीतील हे 38 वे अर्धशतक आहे.(Shikhar Dhawan)
शिखर धवनने 2020 पासून टीम इंडियाकडून वनडे खेळताना 1000 धावाही पूर्ण केल्या आहेत. शिखर धवनने या काळात केवळ 23 सामने खेळले आहेत. तर, केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 16 सामन्यात 745 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार विराट कोहली आहे, विराटने 16 सामन्यात 735 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. त्याने, 18 सामन्यात 632 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर आहे.त्याने, 12 सामन्यात 494 धावा केल्या आहेत.
हेही वाचा