Assembly Election Results 
Latest

Assembly Election Results : मोदीजींची गॅरंटी सर्वांवर भारी पडली! चंद्रशेखर बावनकुळे

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेची सेमीफायनल असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा दिसून आला आहे. चार राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने निर्णायक बहुमताकडे झेप घेतली आहे. तेलंगणात काँग्रेसने बाजी मारत भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) सत्तेतून बाहेर केले आहे. (Assembly Election Results) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निकालाच्या पार्श्वभुमीवर पोस्ट करत म्हटलं आहे की,  "पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदींजींची गॅरंटी सर्वांवर भारी पडली! ." (Assembly Election Results)

Assembly Election Results : 'इंडि'ला मात देत 'भारत' जिंकला..!

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदींजींची गॅरंटी सर्वांवर भारी पडली! मतदारांनी विश्वास टाकला आणि भाजपाला महाविजय मिळवून दिला. मा. मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका डौलाने फडकू लागली. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेचा अढळ विश्वासासह स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चार अमृत स्तंभाचा होत असलेला शाश्वत विकास म्हणजे आजचा विजय आहे. गृहमंत्री मा. अमित शाहजी यांच्या कुशल रणनीतीचा, भाजपा अध्यक्ष मा. जे.पी.नड्डाजी यांच्या संघटन कौशल्याचा तसेच त्या त्या राज्यातील नेतृत्वाचा हा विजय आहे.या अद्भुत विजयात योगदान देणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो..कारण, 'इंडि'ला मात देत 'भारत' जिंकला..!!

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT