दोन वर्षापासून कोरोनाने देशात थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण बेरोजगार आहेत. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. आसाम रायफल्स मध्ये भरती निघाली आहे.
आसाम रायफल्समध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी १२३० पदांसाठी भरती निघाली आहे. ही अधिसूचना आसाम राफल्स ने जारी केली आहे. या जागांसाठी उमेदवार अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करु शकतात. याचे अर्ज ११ सप्टेंबर पासून सुरु झाले आहेत. आसाम रायफल्समध्ये भरती होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी assamrifles.gov.in या वेबसाईटवर भेट द्या.
ग्रुप बी आणि सी साठी होणाऱ्या या भरतीसाठी 1 डिसेंबर 2021 ची तारीख निश्चित करण्यात आली आहे. भरती कधी आणि कोठे होईल, याची माहिती अर्जदारांना 25 ऑक्टोबर नंतर दिली जाईल. उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर वेळोवेळी अधिकृत वेबसाईट तपासणे गरजेचे आहे.
इच्छुक अर्जदारांचे वय 1 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 1998 पूर्वीचा आणि 1 ऑगस्ट 2003 नंतरचा नसावा.
अर्जदाराने तांत्रिक क्षेत्रात येणाऱ्या ट्रेड प्रमाणपत्रासह दहावी किंवा समांतर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
आसाम रायफल्स मध्ये भरती प्रक्रिया पाच टप्प्यात पूर्ण केली जाईल. पहिल्या टप्प्यात शारीरिक चाचणी, दुसऱ्या टप्प्यात शारीरिक कार्यक्षमता चाचणी, तिसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा, चौथ्या टप्प्यात ट्रेड टेस्ट आणि पाचव्या टप्प्यात स्किल टेस्ट असेल.