Dasara special : भाजप करणार घोटाळेबाज राज्य सरकाररुपी रावणाचं दहन | पुढारी

Dasara special : भाजप करणार घोटाळेबाज राज्य सरकाररुपी रावणाचं दहन

मुंबई, पुढारी ऑनलाईन : दसऱ्यानिमित्त (Dasara special) भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचं दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाविकास आघाडी सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे, याचा निषेध करण्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे.

दसऱ्याचं निमित्त साधून भापज महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची संधी साधणार आहे, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. सरकारमधील आणि विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत पाठपुरावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे.

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार नेत्यांना आर्थिक घोटाळ्यांविरोधात आवाज उठवला जात आहे. जरंडेश्वर कारखाना खरेदी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

सोमय्यांच्या या आरोपानंतर आयकर विभागाकडून अजित पवार यांची चौकशी केली जात आहे. तसेच त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या कार्यालयांवर छापे मारून तपास केला जात आहे. घोटाळ्यांबाबत आपल्याजवळ अनेक महत्वाचे पुरावे आहेत, असं सोमय्यांनी म्हंटलं आहे.

महाविकास आघाडीच रावण आहे

खरंतर दसऱ्याला (Dasara special) रावणाचं दहन केलं जातं. पण, भाजपने महाविकास आघाडीच्या सरकारला आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपावरून रावण ठरवलं आहे. भाजपने म्हंटलं आहे की, महाराष्ट्राच्या जनतेसाठी राज्यातील घोटाळेबाज सरकारच रावण आहे. त्यामुळे या घोटाळ्यांच्या रावणाला दहन करण्यासाठी सर्वांनी हजर राहावे, असं भाजप पक्षाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

Back to top button