BJP Vs NCP : चंद्रकांत पाटील यांनी दिलं शरद पवारांच्या टीकेला उत्तर | पुढारी

BJP Vs NCP : चंद्रकांत पाटील यांनी दिलं शरद पवारांच्या टीकेला उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय तपास यंत्रणाच्या (BJP Vs NCP) सततच्या कारवायांमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये तर चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील तपास यंत्रणांवर टीका केल्यानंतर भाजपने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“शरद पवार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर या देशात पहिल्यांदाच धाडी पडल्या आहेत, असं जे बोललं जात आहे. इनकम टॅक्स धाड पडणं, सीबीआयची चौकशी होणं किंवा ईडीनं कारवाई करणं हे कॉमन आहे. बाकीच्या ठिकाणी झालं तर चालतं. तुमच्यावर धाडी पडल्या तर हा सूड उगवण्याचा भाग आहे. हे अधिक वेळ थांबले आहेत, हे पाहुणचार घेत आहेत. अशा प्रकारे म्हणणं बरोबर नाही; पण पुन्हा एकदा त्यांनी ज्या यंत्रणांबद्दल बोललं आहे. त्यांनी त्याचं उत्तर द्यावं”, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Vs NCP) यांनी दिली.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून पवार कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकण्यात आले होते. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरीही छापे टाकण्यात आले. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा केंद्र सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी गैरवापर केला जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला हाेता.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला होता. शरद पवार म्हणाले होते की, “पाहुण्यांनी पाहुणचार घ्यावा; पण आपण अजीर्ण व्हावं इतका पाहुणचार घेऊ नये”.

पहा व्हिडीओ : अमेरिकेत रोवला मराठी झेंडा

हे वाचलंत का?

Back to top button