पुढारी ऑनलाईन
अभिनेत्री अनुष्का सेन हिने (ANUSHKA SEN) पुलाच्या किनारी ग्लॅमरस फोटोशूट केलंय. बालकलाकार म्हणून तिने करिअरची सुरूवात केली होती. सेनने टीव्ही इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. टीव्ही मालिका बालवीर मध्ये अनुष्काच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. सध्या ती अभिनयापेक्षा अधिक सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमी चर्चेत राहते. ती आपले बोल्ड फोटो शेअर करते. सोशल मीडियावर अनुष्का सेन हिच्या ग्लॅमरस फोटोंची गर्दी पाहायला मिळते.(ANUSHKA SEN)
अनुष्का सेन केवळ १९ वर्षांची आहे. इतक्या कमी वयात ती अनेक टीव्ही मालिकेत दिसली होती. 'यहां मैं घर घर खेली', 'देवों के देव महादेव', 'बालवीर', 'इंटरनेट वाला लव्ह', 'अपना टाईम भी आएगा' आणि 'झांसी की रानी' यासारख्या मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहेत. याशिवाय ती खतरों के खिलाडी सीझन-११ मध्ये दिसली होती. ती आपल्या स्टंट्स आणि क्यूटनेसमुळे खूप चर्चेत राहते.
काही दिवसांपूर्वी तिने मालदीवहून आपले काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूप बोल्ड दिसतेय. मालदीव वेकेशनला असताना अनुष्काने आपला बिकिनी लूक मधील फोटो शेअर केला आहे. पुन्हा एकदा अनुष्काचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अनुष्का पुलाच्या किनारी उभी राहून स्टायलिश पोझ देताना दिसतेय. बेज कलरच्या स्ट्रेपी ड्रेसमध्ये ती बोल्ड दिसतेय.
इन्स्टाग्रामवर अनुष्काचे लाखो फॅन्स असतात. तिची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स प्रतीक्षा करतात.