मुंबई, पुढारी ऑनलाईन : ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची सर्व बंधने पाळावी लागतील, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली. उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलविली आहे.
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनमुळे अनेक देशांत चिंता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक घेतली.
ठाकरे यांनी कोविडच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या. केद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. मुबंईसह राज्यातील सर्व विमानतळांवर कडेकेकोट बंदोबस्त ठेवा. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून गरज भासल्यास त्यांना क्वारंटाइन करा. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची सर्व बंधने पाळावीच लागतील, असे ते म्हणाले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य विभागाचे सचिव या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली होती. बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसे कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांग़ितले. व्हेन्टिलेटरची तपासणी करुन ते गरजेनुसार वापरता येईल यादृष्टीने ते सज्ज करुन ठेवण्यात येणार असल्याचेही काकाणी यांनी सांगितले. घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहेत.
हेही वाचा :