इम्रान खान (संग्रहित छायाचित्र ) 
Latest

Allegation against Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानातील पीएमएल-एनचे नेते मोहसीन शाहनवाज रांझा यांनी शनिवारी (दि.२२) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मोहसीन शाहनवाज यांनी इम्रान खान यांच्यावर हत्या करण्यात सहकार्य केल्याचा आरोप केला आहे. रांझा यांनी याबाबतची तक्रार राजधानीतील सचिवालय पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. (Allegation against Imran Khan)

मोहसीन रांझा यांच्यावर पाकिस्तानातील इस्मालामाबाद येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर हल्ला करण्यात आला होता. यानंतर मोहसीन रांझा यांनी ही तक्रार दिली आहे. रांझा यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी पीटीआयचे कार्यकर्ते आणि समर्थक निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत होते. तोशाखाना प्रकरणी त्यांच्या पक्षप्रमुखांना अपात्र घोषित करण्यात आल्याने पीटीआयचे कार्यकर्ते हा विरोध करत होते. (Allegation against Imran Khan)

इम्रान खान यांच्यावर हत्या करण्यात सहाय्य केल्याचा तसेच हत्या करण्यास भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोहसीन रांझा तक्रारीत म्हणाले की, माझी गाडीवर हल्ला करण्यात आला होता. गाडीची काच फोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्रीनगर हा राज्यमार्ग पीटीआयच्या इशाऱ्यावर ब्लॉक करण्यात आला. यापूर्वी पीटीआयच्या नेतृत्वाविरोधात आंतकवादाशी संबंधित प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. ज्यामध्ये इम्रान खान, महासचिव असद उमर आणि अन्य १०० कार्य़कर्त्यांचा समावेश आहे. (Allegation against Imran Khan)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT