Latest

Ahmedabad blasts : गोध्राकांडचा सूड म्हणून अहमदाबादमध्ये केले होते २१ बाॅम्बस्फोट

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : २००८ मध्ये झालेल्या अहमदाबाद बॉम्बस्फोट (Ahmedabad blasts) प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणातील ४९ गुन्हेगारांपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, उरलेल्या ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. या महत्त्वाच्या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

नेमकं काय आहे अहमदाबाद बाॅम्बस्फोट प्रकरण? 

२६ जुलै २००८ या दिवशी केवळ ७० मिनिटांत २१ साखळी बाॅम्बस्फोटांनी अहमदाबाद शहर हादरले होते. मध्य शहरात हे बाॅम्बस्फोट करण्यात आल्यामुळे ५६ लोकांचा मृत्यू झाला होता. सुमारे २०० लोक गंभीर जखमी झाले होते. २००९ मध्ये सुरु झालेल्या या प्रकरणाच्या चौकशीमध्ये जवळजवळ ११०० लोकांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या. ८० आरोपींवर हे प्रकरण चालले. त्यातील ४९ गुन्हेगार म्हणून पुढे होते, तर त्यातील २८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

ग्रोधाकांडचा बदला म्हणून केले होते २१ बाॅम्बस्फोट

या प्रकरणात पोलिसांना असं सांगितलं की, दहशतवादी संघटना असणाऱ्या इंडियन मुजाहिदीन (IM) आणि बॅन करण्यात आलेल्या स्टुडेंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या संघटनांशी जोडलेल्या लोकांनी अहमदाबाद येथे साखळी बाॅम्बस्फोट घडवून आणले होते. पोलिसांचा दावा असा होता की, IM च्या दहशतवाद्यांनी २००२ मध्ये झालेल्या गोध्राकांडचा बदला म्हणून हे बाॅम्बस्फोट केलेले होते. (Ahmedabad blasts)

अहमदाबाद बाॅम्बस्फोट प्रकरणचा १३ वर्षे चालला होता खटला

३५ केसेस एकत्र आणून मोठी केस बनविण्यात आली, त्यानंतर २००९ मध्ये या प्रकरणाची ट्रायल सुरू झाली. अहमदाबाद आणि सूरतमध्ये झालेल्या बाॅम्बब्लाॅस्टच्या ठिकाणी पोलिसांना बाॅम्ब आढळून आल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाला विशिष्ट वळण मिळालं. प्रोसिक्यूशनने न्यायाधीश ए. आर. पटेल यांच्यासमोर ११०० लोकांच्या साक्षी घेतल्या.

या प्रकरणासंबंधित ६००० कागदपत्रे सादर करण्यात आलीत. ३ लाख ४७ हजार आणि ८०० पानांच्या ५४७ चार्जशीट तयार करण्यात आल्या. पहिली चार्जशीट ही ९ हजार ८०० पानांची होती. ७७ आरोपींच्या प्रकरणात १४ वर्षांनंतर युक्तीवाद पूर्ण झाले. या प्रकरणाचा निर्णय घेत असताना ७ न्यायाधीश बदलले. कोरोना काळाच लाॅकडाऊनमध्येही या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

संरक्षणाच्या दृष्टीने सुरूवातीला या प्रकरणाची ट्रायल साबरमती तुरुंगात करण्यात आली होती. या प्रकरणाची सर्वात जास्त सुनावणी ही व्हिडिओ काॅन्फरंसिंगद्वारे करण्यात आली. खून, खूनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट, याचबरोबर दहशतवाद विरोधी कायद्यानुसार आरोपींवर खटला दाखल करण्यात आला होता.

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT