

नाशिक पुढारी वृत्तसेवा : शहरात बुधवारी (दि. 16) वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यामध्ये 18 ते 30 वयोगटातील दोन तरुण व दोन तरुणी यांच्यासह 46 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
सातपूर येथील राधाकृष्णनगर परिसरात राहणार्या मनोज अशोक मोरे (28) या तरुणाने बुधवारी (दि. 16) मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्या घटनेत अंबड येथील पॉवर हाउस परिसराजवळ राहणार्या परशुराम लक्ष्मण पवार (23) याने बुधवारी राहत्या घरात विष सेवन करून आत्महत्या केल्याचे उघड झाले, तर मोरवाडी येथील बाळू आबाजी अहिरे (46) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे बुधवारी आढळून आले.
या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गंगापूर शिवारातील कॅनॉलरोड परिसरातील रहिवासी शीतल अनिल शेवरे (18) या युवतीने राहत्या घरात गळफास घेतल्याचे बुधवारी दुपारी आढळून आले. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर पाथर्डी फाटा परिसरातील भाग्यश्री सागर उफाडे (21) यांनी राहत्या घरात बुधवारी दुपारी गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.