Latest

matchboxes : आता ‘आग’ ही महागली : १४ वर्षांनंतर काडीपेटीची किंमत वाढली

नंदू लटके

एकीकडे पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस आणि खाद्‍य तेलाच्‍या किंमतींचा भडका उडला असतानाच काडीपेटीची (matchboxes) किंमतही वाढली आहे. तब्‍बल १४ वर्षानंतर काडीपेटीच्‍या किंमतीमध्‍ये वाढ झाली आहे. एक रुपयांना मिळणारी काडीपेटी आता दोन रुपयांना मिळणार आहे. ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू होईल. (matchboxes) पाच प्रमुख उद्‍योगांनी सर्वसहमतीने दरवाढीचा निर्णय घेतला असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

२००७मध्‍ये झाली होती काडीपेटीच्‍या दरात वाढ

काडीपेटीच्‍या दरात २००७मध्‍ये वाढ करणय्‍ता आली होती. यावेळी ५० पैशांना मिळणारी काडीपेटीचा दर एक रुपया करण्‍यात आला होता. आता पुन्‍हा एकदा दरवाढ करण्‍यासाठी शिवकाशी येथे ऑल इंडिया चेंबर ऑफ माचिसची बैठकी झाली. यामध्‍ये एक रुपयांनी दर वाढविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

(matchboxes ) दरवाढीचे कारण

कारण स्‍पष्‍ट करताना उत्‍पादकांनी स्‍पष्‍ट केली की, काडीपेटी तयार करताना १०पेक्षा अधिक प्रकारच्‍या कच्‍चा माल आवश्‍यक असतो. मागील काही दिवसांमध्‍ये कच्‍चा मालाच्‍या किंमतींमध्‍ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्‍यामुळे सध्‍याच्‍या दरात विक्री करणे अशक्‍य आहे. तसेच डिझेलच्‍या दरात झालेल्‍या वाढीमुळेही उद्‍योगावर अतिरिक्‍त ताण निर्माण झाल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

काडीपेटी उद्‍योगातून मिळतो ४ लाख जणांना रोजगार

तामिळनाडूमधील काडीपेटी उद्‍योगातून तब्‍बल चार लाख जणांना रोजगार उपलब्‍ध होतो. या उद्‍योगात तब्‍बल ९० टक्‍के महिला आहेत. आता  दरवाढीचा लाभ कामगारांनाही मिळेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT