यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : जनसंघाच्या ताकदीपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चिल्लर आहेत, अशी घणाघाती टीका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शुक्रवारी केली.
वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी पवारांचा उल्लेख 'वयोवृद्ध पुढारी' असा केला. शरद पवार यांनी केवळ वैचारिक दिवाळखोर तयार करण्याचे काम केले आहे. जनसंघाला केवळ दोनच संघ मान्य आहेत. एक भगवान गौतम बुद्धांचा संघ आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हे दोन्ही संघ वैचारिकद़ृष्ट्या सुद़ृढ आहेत. जनसंघाच्या ताकदीपुढे शरद पवार चिल्लर आहेत, असे ते म्हणाले.
संबंधित बातम्या :
एस.टी. महामंडळाचे दिवाळीपूर्वी विलीनीकरण व्हावे आणि कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग मिळावा, अशी आमची मागणी आहे. त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार करीत आहेत, असा आरोप करीत सदावर्ते यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. अर्थ खाते आपल्याकडे आहे म्हणून उगीचच चांगल्या कामात अडथळा आणाल, तर ते सहन केले जाणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ऐन दिवाळीत एस.टी. कर्मचारी काम बंद पुकारतील, असा इशारा त्यांनी दिला. शरद पवार यांच्या विचारांना नथुराम गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतकीही किंमत नाही, असे आक्षेपार्ह वक्तव्यही सदावर्ते यांनी केले.
मुंबई : राज्यात महायुती सरकार आल्यापासून देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या करणार्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण सुरू आहे, असा आरोप करत गुणरत्न सदावर्ते यांच्यासारख्यांवर कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. गोडसेचे उदात्तीकरण करणार्या सदावर्तेंवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्तेंवर कडक कारवाई करून महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे हे दाखवून द्यावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले.