ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच मतदार संघात घेरण्याची मनसुबे ठाकरे गटाने आखले असून मुख्यमंत्र्यांच्या कोपरी- पाचपाखाडी या मतदार संघात आदित्य ठाकरे यांनी गुप्त सर्व्हे सुरु केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये स्वतः आदित्य ठाकरे शिंदे यांच्या विरोधात ऊभे राहिल्यास मतदारांचा कौल काय आहे, याचे कानोसा या सर्व्हेच्या माध्यमातून घेतला जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त ठाकरे गटातून आणखी कोणता चेहरा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभा केला जाईल, याची देखील चाचपणी या गुप्त सव्र्हेच्या माध्यमातून केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (Aditya Thackeray)
संबधित बातम्या :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात कमालीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाच्या माध्यमातून एकमेकांना धक्का देण्याचे काम सुरु असून आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच मतदार संघात घेरण्याची मनसुबे ठाकरे गटाकडून आखण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या त्यांच्या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येतात. आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मतदार संघात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. यावर शिंदे यांनी मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ठाकरे गटाने ही बाबा गांभीर्याने घेतली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शिंदे यांना धक्का द्यायचा असेल तर त्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातच उतरावे लागेल अशी व्यूहरचना ठाकरे गटाकडून आखली जात आहे. यासाठी त्यांच्या मतदार संघात गुप्त सर्व्हेचे काम सुरु करण्यात आले आहे. (Aditya Thackeray)
या सर्व्हेमध्ये लोकांच्या मतांचा कौल घेतला जात आहे, शिंदे यांच्याबाबत लोकांच्या मनात काय नाराजी आहे याची चाचपणी देखील केली जात आहे. विशेष म्हणजे इतर पक्ष कसे मदत करू शकतात तसेच त्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, याचा देखील अभ्यास या सर्व्हेच्या माध्यमातून केला जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणता चेहरा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभा करू शकतो याची देखील चाचपणी सुरु आहे. (Aditya Thackeray)
हेही वाचा :