Aaditya Thackeray tweet : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : आदित्य ठाकरे | पुढारी

Aaditya Thackeray tweet : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : आदित्य ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (दि.११)  लागला. सर्वोच्‍च न्‍यायालयाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. या निर्णयानंतर आदित्य ठाकरे  यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा” (Aaditya Thackeray tweet)

Aaditya Thackeray tweet :  त्यांचा सत्तेचा लोभ उघड : आदित्य ठाकरे

बेकायदेशीर, घटनाबाह्य, अनैतिक… विशेषत: आजच्या निकालानंतर, मिंदे- भाजप गद्दार सरकारकडे पाहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. विरोधी सरकारचा ताबा घेण्यामध्ये पूर्वीच्या राज्यपालांची भूमिका आणि मदत आहे. यात लोकशाही आणि राज्यघटना दडपल्याचे स्पष्ट होते. त्यांनी राज्यपाल म्हणून नव्हे तर पक्षाचा माणूस म्हणून काम केले. जर काही नैतिकता  उरली असेल तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांचा सत्तेचा लोभ उघड आहे, पण नैतिकता आणि लोकशाही सर्वोच्च असली पाहिजे. ( supreme court decision on shiv sena today )

एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा : उद्धव ठाकरे 

आजपासून लढाईला खरी सुरूवात झाली आहे. मी दिलेला राजीनामा कायदेशीररित्या चुकीचा असू शकतो; पण नैतिकतेचा विचार केला तर पक्षाने आणि माझ्या वडिलांनी सर्व काही देवूनही जर माझ्याकडे बोट करत असतील, विश्वासघात करणारे माझ्यावर अविश्वास आणत असतील तर हे मला पटणार नव्हतं म्हणून मी राजीनामा दिला. नैतिकता असेल तर मी राजीनामा दिला तसा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, असे ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.  ( supreme court decision on shiv sena today )

हेही वाचा 

Back to top button