प्रिंस नरूल (Prince Narula ) याची पत्नी अभिनेत्री युविका चौधरीला ( Yuvika Chaudhary) हिला वादग्रस्त विधान करणे महागात पडले आहे. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. युविकाने ( Yuvika Chaudhary) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तिने जातीवाचक वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोलही झाली होती.
जातीवाचक वादग्रस्त विधानामूळे हरियाणा पोलिसांनी युविकावर कारवाई करत तिला ( दि. १८ ) अटक केली. तिच्याविराेधात रजत कलसन यांनी तक्रार केली हाेती. हिसार येथील हांसी पोलिस ठाण्यात तिची चाैकशीही झाली. तीन तासानंतर तिला जामीन मंजूर झाला. युविकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जातिवाचक विधान केले हाेते. या आरोपाखाली तिच्याविराेधात एससी/ एसटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाआहे.
युविकाचा वादग्रस्त व्हिडिओमध्ये व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली होती. ट्विटरवर #ArrestYuvikaChoudhary ट्रेंड सुरु झाला. सोशल मीडियावर अटकेची मागणी होवू लागली हाेती.
वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर युविकावर टीकेची झाेड उठली. यानंतर सोशल मीडियावर तिने माफी मागितली. मी उच्चारलेल्या शब्दांचा अर्थ मला माहीत नव्हता, कोणाला त्रास देण्याचा माझा उद्देश नव्हता. कोणाच्या भावना दूखावल्यास मी त्यांची माफी मागते. मला आशा आहे की, तुम्ही मला समजून घ्याल"
युविका चौधरी ही प्रिंस नरूलाची (Prince Narula ) पत्नी असून ती एक अभिनेत्री आणि मॉडेलही आहे. तिने वंडरलॅंड या म्युजिक अल्बमसह डॅडी कूल मुंडे फुल या चित्रपटात ती चमकली आहे.
हेही वाचलं का?