Sunny Leone 
Latest

Sunny Leone : नव्या लूकसह सनी IFFSA च्या रेड कार्पेटवर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IFFSA टोरंटोच्या गाला रेड कार्पेट आणि कॉकटेल रिसेप्शन इव्हेंटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या ( Sunny Leone ) लूकची चर्चा रंगली आहे. सनीने IFFSA च्या रिसेप्शन इव्हेंटमध्ये डिझायनर फौअद सरकीने डिझाईन केलेला खास ड्रेस घालून चाहत्यांना भुरळ घातली. तिच्या या मंत्रमुग्ध करून जाणाऱ्या अदा या लूकमध्ये पाहायला मिळाल्या.

संबधित बातम्या 

सनी लिओनीच्या लव्हेंडर रंगाचा लिलाक स्वीटहार्ट ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये तिच्या सौंदर्यांची मोहकता सगळ्यांना भावून गेली. फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचा प्रीमियर लॉन्च झाल्यामुळे सनी तिच्या कास्ट आणि क्रू मेंबर्ससह चित्रपटाच्या 'केनेडी'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सनीने 'Such a nice night at the @iffsatoronto Gala'. असे लिहिले आहेत. सनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तिचा अलीकडेच संगीत व्हिडिओ 'मेरा पिया घर आया 2.0' ने सोशल मीडियावर खूपच लोकप्रियता मिळाली आहे. ती तिच्या आगामी चित्रपट 'कोटेशन गँग' टिमसह तमिळ चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यात जॉकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन सारख्या कलाकारांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT