Latest

Sayali Sanjeev : गळ्यात कोल्हापूरी साज, नाकात नथ; सायलीचा ‘हर हर महादेव’ लूक

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिजीत देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव'  चित्रपट २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सिनेमागृहात दाखल झाला. या चित्रपटात मराठी अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सायली संजीव यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यात अमृताने सोनाबाई देशपांडेची भूमिका तर सायली संजीवने महाराणी सईबाई भोसलेची भूमिका साकारली आहे. 'हर हर महादेव' या चित्रपट ऐतिहासिक असून, बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली केवळ ३०० सैनिकांनी बाराशेहून अधिक शत्रूच्या सैनिकाचा सामना केल्याचा इतिहास दाखविला आहे. हा चित्रपट थिअटरमध्ये येताच चाहत्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच दरम्यान चित्रपटातील सायली संजीवच्या ( Sayali Sanjeev ) मराठमोळ्या लूकने चाहत्यांना भूरळ घातली.

अभिनेत्री सायली संजीवने ( Sayali Sanjeev ) तिच्या आगामी 'हर हर महादेव' रिलीज होताच चाहत्यांना तो कसा वाटला? याबाबतची प्रतिक्रिया देताना एक मराठमोळा लूक शेअर केला आहे. यात तिने हिरव्या रंगाच्या सहावारी साडी परिधान केली आहे. हिरव्या रंगाच्या साडीवर रेड रंगाचा पदर सायलीवर खूलून दिसतोय. केसांचा अंबाडा आणि त्यावर पांढऱ्या फुलांचा गजरा, नाकाथ मोत्याची नथ, गळ्यात कोल्हापूरी साज, कपालावर टिकली, कानात फुले, हातात सोनेरी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या, मेकअप आणि रेड लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. फोटोला पोझ देताना कधी तिचे लाजणे तर कधी तिचे गोड हस्याने चाहत्यांना भारावून सोडले आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'हर हर महादेव..?तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात .. नक्की बघा आणि कळवा कसा वाटला.. ??'. असे लिहिले आहे. यावरून सायलीच्या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना दिसतेय. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने '??Beauty', 'महाराणी सईबाईसाहेब ..????❤️', 'Chhan?', '❤️? खुपचं सुंदर ?', 'अती सुंदर दिसत आहेस तू ?????????❤️❤️❤️', 'Superb ❤️?', 'खुप सुंदर अनुभव ??❤️❤️', 'Excellent', 'खूपच सुंदर ?☺️❤️', '❤️❤️ VERY NICE ❤️❤️', 'फारच छान, साज?❤️', 'Very nice❤️', 'आपली हीच मराठी ची शान नाकात नथ अंबाडा ?????', 'Oh ho ❤️?', 'Beautiful nicely cutely ❤️', 'Looking so beautiful?✨❤', 'लोभस रूप'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला ३० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. २५ ऑक्टोबरला 'हर हर महादेव' हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत रिलीज करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT