Manasi Naik  
Latest

Manasi Naik : अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईकने (Manasi Naik) गेल्या वर्षी प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली होती. यानंतर काही कारणास्तव सोशल मीडियावर दोघांनी एकमेंकाना अनफॉलो केलं. यावरून मानसी नाईकच्या संसारात काहीतरी बिनसल्याचे आणि घटस्फोट घेत असल्याची चर्चांना सोशल मीडियावर उधान आले. याच दरम्यान आता मानसीने घटस्फोटाबाबतचा एक मोठा खुलासा केला आहे.

नुकतेच मानसी नाईकने (Manasi Naik) दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, घटस्फोटाची चर्चा खरी असून लवकरच आम्ही विभक्त होणार आहोत. यासाठी मी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. मी माझ्या परिने हे नातं टिकवण्याचा खूपच प्रयत्न केला परंतु, शेवटी निराशाच पदरी पडणार आहे, असेही ती म्हणाली.

'माझ्या घटस्फोटाची पसरलेली अफवा खरी आहे, मी खोटे बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून ती प्रक्रिया सुरू आहे आणि मी सध्या या प्रसगांने खूपच भावूक झाली आहे. मला माझे स्वतःचे एक कुटुंब हवे होतं म्हणून लग्न केलं. परंतु, घाईगडबडीत केलंल लग्न मला चुकीचे वाटते आहे. त्यावेळी सर्व गोष्टीचा विचार केला असता तर, ही चूक झाली नसती. या विवाहाच्या बंधनातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. प्रदीप आणि त्याच्या कुटुंबाचा खूप आदर करते, असे ही मानसी म्हणाली.

पुढे मानसी असे म्हणाली, 'मला आता फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. सध्या माझे कुटुंब, माझे मित्र आणि माझे चाहते यांच्यासाठी जगणार आहे. एक कलाकार म्हणून माझ्यावर या सर्वांनी विश्वास ठेवला असून तो मला आता सार्थ करायचा आहे. यामुळे मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करणार आणि माझ्यासोबत तुमचा आशिर्वाद आहेतच' असेही तिने म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT