Madhuri Dixit 
Latest

Madhuri Dixit : मुझे पलकों की छॉव में रहने दो❤️; धकधक गर्लचा एथनिक अदा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit ) ही केवळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच नाही तर ती फॅशनच्या बाबतीतही सजग असते. तिच्या वेगवेगळ्या फॅशनने तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या स्टार्संना ती नेहमीच टक्कर देत असते. मग तो मराठमोळा ट्रेडिशनल लूक असो किंवा आधुनिक असो. सध्या माधुरीच्या काही लेटेस्ट लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने ( Madhuri Dixit ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर व्हाईट- सोनेरी लेंहग्यातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत धकधक गर्ल माधुरीच्या लेंहेंगा आणि सिव्हलेस ब्लाऊजने चार चॉद लावले आहेत. मोकळ्या केसांची स्टाईल, मेकअप, रेड लिपस्टिक, , मॅचिंग ब्रेसलेट आणि गळ्यात ग्रीन रंगाची ज्वेलरीने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. फोटोला पोझ माधुरीने तिच्या कमरेवर हात ठेवले आहेत. तिच्या निखल हास्य आणि मोहक अदां चाहत्यांच्या मनात घर करतात.

या फोटोला तिने 'मुझे पलकों की छांव में रहने दो' अशी कॅप्शन दिली आहे. यातून माधुरीने टोन्ड बॉडी आणि कर्व्ही फिगर फ्लॉंट करताना दिसली. तर तिने यावेळी मॅचिंग दुपट्टाही परिधान केला आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

माधुरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने 'Gorgeous' तर रविना टंडनने 'Beauty……❤️' अशी कॅप्शन लिहिली आहे. एका युजर्सने 'Gorgeous ❤️?', 'So cute ❤️', 'Looking gorgeous?', '❤️❤️ looking always beautiful maddam ??❤️', 'Superb ??', 'Perfect??', 'Apsara aali re ??❤️', 'Kitni khubsurat ho aap?❤️', 'Pretty ??', 'so pretty and how omg, Woww ?', 'Amazing ??'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकर्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींना कॉमेन्टस बॉक्स भरला आहे.

या फोटोला आतापर्यत जवळपास २ लाखाहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. माधुरीचा हा लेंहगा फॅशन डिझायनर फाल्गुनी शेन आणि पीकॉक यांच्या कलेक्शनमधून निवडला होता. याशिवाय माधुरीचे मरून आणि ब्लू कलरच्या प्रिंटेड लेहेंग्यातील फोटोदेखील व्हायरल झाले होते.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT