Sidharth-Kiara 
Latest

Sidharth-Kiara : कियारा-सिद्धार्थ जपानमध्ये व्हेकेशन मूडमध्ये?; फोटो व्हायरल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा जपानमध्ये सुंट्ट्याचा आनंद घेत आहेत. Sidharth-Kiara क्यूट कपलचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होवून याबाबतची माहिती मिळाली आहे. हा फोटो सोशल मीडियावनर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय.

बिझी शेड्युलमधून वेळ काढून कियारा-सिद्धार्थ ( Sidharth-Kiara ) एकमेंकासोबत टाईम्स स्पेंड करत असतात. सध्याही दोघेजण जपान शहरात सुंट्ट्याचा मनमुराद आनंद घेत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सिद्धार्थच्या फॅन अकाऊंटवर दोघांचा फोटो व्हायरल होवून एकत्रित जपानमध्ये असल्याचे बोलले जात आहे. या फोटोत कियारा-सिद्धार्थ दोघेजण आनंदीत असून कियारा गोल्डन कलरच्या लेहग्यांत ग्लॅमरस दिसतेय. तर सिद्धार्थने शेरवाणी परिधान केली आहे.

या फोटोवरून हे क्यूट कपल जपानमध्ये एकमेंकासोबत टाईम स्पेंड करत असल्याचे समजते. मात्र, ते खरोखर जपानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत की नाही? याबाबतची अधिकृत्त माहिती मिळालेली नाही. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT