Bipasha Basu Pregnant 
Latest

Bipasha Basu Pregnant : प्रेग्नन्सीत बिपाशा डान्स करते तेव्हा…; नेटकऱ्यांकडून पुन्हा ट्रोल (Video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर दोघेजण लवकरच आई- बाबा होणार आहेत. या दरम्यान बिपाशा तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात ( Bipasha Basu Pregnant) अत्यंत आंनदित असून तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो दिसतोय. एक दिवसापूर्वी बिपाशाने आतापर्यंत सर्वात बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट करून चाहत्याच्या संपर्कात आली होती. यानंतर तिच्यावर 'प्रेग्नन्सीमध्ये तरी असे बोल्ड फोटोशूट करू नका' असे म्हणत नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठविली होती. याच दरम्यान बिपाशा पुन्हा एकदा करणसोबत डान्स करताना दिसली आणि तिला नेटकऱ्याने पुन्हा ट्रोल केलं आहे.

अभिनेत्री बिपाशा बसू नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर प्रेग्नन्सी काळात ( Bipasha Basu Pregnant) एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात बिपाशा आणि करण एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसतात. या गाण्यातून बिपाशा लवकरच आई होणार असल्याचे सांगितले जात आहे. यात बिपाशाने ब्लॅक आणि व्हाईट रंगाच्या वनपीसमध्ये तर करण व्हाईट टीशर्ट आणि डेमिनमध्ये दिसतोय. हा व्हिडिओ एका रूममध्ये शूट केला असून बिपासा यावेळी आनंदीत आहे. परंतु, हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच पुन्हा एकदा बिपाशावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच काही चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केलं तर काही नेटकऱ्यांनी तिला खडेबाल सुनावले. यात तिचे कौतुक करताना 'Ha ha ha ??? few more days left ❤️❤️❤️❤️❤️', 'Cute?', 'So Beautiful woman ❤️❤️', 'Hot??', 'Superb Pic ?', 'So cute…!! God bless you', 'Hayeee ????', 'U beauty ❤️❤️❤️', 'Pregnancy suits you… ❤️❤️…', 'Hotness overloaded ????', 'mashallah ?', 'looking gorgeous ?', 'look very cute ? glowing', 'Soooooooo cuteeeeeee!!!!!!!!!!! ❤️❤️', 'stunning yar ??'. अशा कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी तिला 'हिला प्रेग्नन्सीच्या काळात असे वागते काय?', 'हे असे वागणे शोभते काय? ', 'बाळाचा तरी विचार करा?', 'असे वागू नका?', 'मुर्ख आहे काय?' असे ट्रोल करताना म्हटलं आहे.

याआधाही बिपाशाने प्रेग्नन्सीदरम्यान मॅटर्निटी फोटोशूट केलं होतं. या फोटोला तिने 'प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वतःवर प्रेम करा. ज्या शरीरात तुम्ही राहाता, त्याच्यावरही प्रेम करा' असे कॅप्शन दिलं होतं. यावेळी ती गोल्डन कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसली असून तिने एका स्टूलवर बसून बेबी बंप फ्लॉन्ट केले होतं. यानंतर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT