Anushka Shetty Bday : ‘बाहुबली’ची देवसेना इतक्या कोटींची मालकीन?

 Anushka Shetty Bday
Anushka Shetty Bday
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : डॉन (Don), लिंगा (Lingaa), मिर्ची (Mirchi) आणि बाहुबली (Baahubali) यासारख्या सुपरहीट चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटविणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी चर्चेत आहे. बाहुबली या चित्रपटातील तिच्या देवसेनेची भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. चाहते तिला 'देवसेना' या नावानेच ओळखतात. तर अनुष्काची तुलना साऊथ सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. आधी अनुष्का तिसरीच्या मुलांना शिकवणी द्यायची, पण आज ती करोडोंची मालकिन आहे. यामुळे तिच्या खास वाढदिवसानिमित्ताने तिच्या संपत्तीची आकडा जाणून घेवूयात… ( Anushka Shetty Bday )

एका रिपोर्टनुसार, अभिनेत्री अनुष्का शेट्टी सध्या १४३ कोटींची मालकीन आहे. अनुष्काची वार्षिक कमाई ५ ते ६ कोटी रुपये आहे. हैदराबाद येथील जुबली हिल्स भागात असलेल्या वुड्स अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर ती राहते.प्लॅटची  किंमत सुमारे १२ कोटी रुपये आहे. अनुष्का शेट्टी साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

अनुष्का एका चित्रपटात काम करण्यासाठी पाच कोटी रुपये घेते.  ती लक्झरी कारची शौकीन आहे. तिच्याकडे अनेक मोठ्या ब्रँडच्या कार आहेत. यात BMW 6 ( किंमत ६६.५० लाख) , Audi A6 ( किंमत ५५.८६ लाख) , Audi Q5 ( किंमत सुमारे ६१.५२ लाख ) आणि Toyota Corolla (किंमत 21 लाख रूपये) सारख्या लक्झरी कार आहेत. ( Anushka Shetty Bday )

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का शेट्टी ध्यान योग कार्यशाळा घेत होती. यानंतर ती योगा प्रशिक्षक बनली. मुंबईत योगाचे क्सासेस घेण्यास सुरुवात केली. ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का तिसरीच्या मुलांना शिकवत होती. यानंतर काही काळानंतर अनुष्का सिनेसृष्टीकडे वळली. प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्काने २००५ मध्ये रिलीज झालेल्या तेलुगू चित्रपट 'सुपर' मधून पहिल्यांदा पदार्पण केले. 'बाहुबली'शिवाय अनुष्काने अरुंधती (२००९), वेदम (२०१०), रुद्रमादेवी ( २०१५) आणि सिंघम सीरिज सारख्या हिट चित्रपटांमध्ये दिसली.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news