प्रभाकर कुलकर्णी यांचे निधन

प्रभाकर कुलकर्णी यांचे निधन

Published on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कुलकर्णी (वय 89, रा. गणेश कॉलनी, आयटीआय जवळ) यांचे रविवारी निधन झाले. पत्रकारितेमध्ये गेल्या सहा दशकांपासून ते कार्यरत होते.

विद्यार्थिदशेपासूनच कुलकर्णी यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रातही केले आहे. 64 वर्षे पत्रकारिता करणार्‍या कुलकर्णी यांचा अनेक सेवाभावी संस्थांशी संबंध होता. गायन समाज देवल क्लबचे ते पंधरा वर्षे संचालक होते. महालक्ष्मी बँक, ब्राह्मण सभेशी ते संबंधित होते.

कोल्हापुरात संगीत शाहू रजनी सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. कोल्हापूर सिने पत्रकार संघाचे अनेक वर्षे ते अध्यक्ष होते. त्यांना पत्रकार संघटनेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news