अनुष्का शर्माने (Anushka Sharma) इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात तिने पोपटी रंगाची बिकनी परिधान केली आहे. 
Latest

Anushka Sharma : पोपटी बिकनी घालून अनुष्काने दिला किलर लुक!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या लूक आणि फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. आणि याच्याच जोरावर ती सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. अनुष्का एक अभिनेत्री आहे जी तिच्या अभिनयासाठी तसेच तिच्या मोकळ्या विचारांसाठीही ओळखली जाते. फेसबुक असो, इन्स्टाग्राम असो की, टीविटर असो अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर चाहते तिच्या नवनव्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच अनुष्काने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही पोस्ट जोरदार व्हायरल होत असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात तिने पोपटी रंगाची बिकनी परिधान केली आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून ती अनुष्का स्विमींगपूलमध्ये उतरून आनंद लुटताना दिसत आहे. तिने आपले केस खुले सोडले आहेत. अभिनेत्रीची ही शैली इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. चाहत्यांसोबतच पती विराट कोहलीनेही अनुष्काच्या या फोटोचे कौतुक केले आहे. विराटने इमोजी आणि हार्टची खूण केली आहे. यासोबतच प्रियांका चोप्रानेही कमेंट करत कौतुक केले आहे.

वाचकहो; तुम्हाला माहिती आहेच की, क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे 2017 मध्ये लग्न झाले. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मागिल वर्षीच अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. जिचं नाव 'वामिका' असं ठेवलं आहे. शाहरुख खान आणि कतरिना कैफच्या यांच्या 'झिरो' चित्रपटात अनुष्का शेवटची दिसली होती. यानंतर तिने निर्माता म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले. अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखालील 'पाताल लोक' ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नुकतेच त्यांची 9 महिन्यांची मुलगी वामिकासह दुबईहून परतले. हे सेलिब्रिटी कपल शनिवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. दुबईत सुरू असलेल्या ICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी अनुष्का भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT