अभिनेता आर. माधवन दुबईला शिफ्ट होणार 
Latest

अभिनेता आर. माधवन दुबईला शिफ्ट होणार

backup backup

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेता आर. माधवन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. 'रहना है तेरे दिल में' चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. मात्र, नुकतेच आर. माधवनने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो लवकरच त्याच्या पत्नी आणि मुलासह दुबईत शिफ्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आर. माधवनचा मुलगा वेदांत हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे. काही दिवसांपूर्वी बंगळूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या जलतरण स्पर्धेमध्ये मुलगा वेदांतने महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली होती. त्यानंतर आता तो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करत आहे. भारतात मोठ्या तलावांची कमतरता आहे. तर दुसरीकडे जे तलाव आहेत ते कोरोनामुळे बंद आहेत. दुबईमध्ये अनेक मोठे तलाव आहेत. त्यामुळेच वेदांतच्या सरावासाठी आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांनी दुबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.

आर माधवनने सांगितले की, त्याच्या मुलाला अभिनयात रस नाही. भविष्यातही अभिनय क्षेत्रात येण्याची कोणते नियोजन नाही. त्याची आणि पत्नीची इच्छा आहे की, त्यांच्या मुलाने त्याच्या आवडीच्या क्षेत्रात भविष्य घडवावे. ते नेहमी त्याच्या पाठीशी उभे असतील. सध्या वेदांतचे लक्ष आगामी ऑलिम्पिककडे आहे. वेदांत केवळ आर माधवनचेच नव्हे तर भारताचे नावही रोशन करेल अशी अपेक्षा आहे.

वेदांत माधवन उत्तम जलतरणपटू आहे. वेदांतला जलतरणात 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडेच, वेदांतने 47 व्या ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये 7 पदके जिंकली. ही स्पर्धा बंगळुरू येथे पार पडली होती. वेदांतने या स्पर्धेत चार रौप्यपदके आणि तीन कांस्यपदके जिंकली.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT