पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अभिनेत्री अक्षया देवधर ( Akshaya Deodhar ) आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचा नुकताच साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला. या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांना आश्चर्यचकित केले. सध्या हार्दिकने अक्षयाचा वाढदिवस हटके अंदाजात साजरा केला आहे.
छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून राणादा म्हणजे, हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजे, अक्षया देवधर यांची जोडी चाहत्याच्या घराघरांत पोहोचली होती. मालिकेतील दोघांवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. तर सध्या ही जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बोडीत अडकणार आहेत. नुकताच हार्दिक आणि अक्षयाचा धुमधडाक्यात साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला.
अक्षयाचा ( Akshaya Deodhar ) आज १३ मे रोजी वाढदिवस असल्याने हार्दिकने तिला खास सरप्राईज दिले आहे. हार्दिकने रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तिचा वाढदिवस साजरा करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अक्षया ब्लॅक रंगाच्या डेनिम आणि हार्दिकने जीन्स -टिशर्ट परिधान केली आहे. यावेळी दोघेही प्रचंड आनंदीत दिसत होते. यावेळी हार्दिकने होणाऱ्या पत्नीसाठी दोन मोठे केक आणले होते. तसेच फुगे लावून डेकोरेशन करण्यात आले. यातील विशेष म्हणजे, यातील एक केक खास पद्धतीचा होता.
हार्दिकने तिच्या इंन्स्टाग्रामवर वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने 'माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय आणि मौल्यवान व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा'असे लिहिले आहे. यानंतर हार्दिकच्या पोस्टवर अक्षयाने 'आय लव्ह यू' अशी हटके कॉमेन्टस केली आहे. फोटोला पोझ देताना राणादा आणि पाठकबाई खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत होते. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह मराठी कलाकारांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात विणा जगतापने '#Ahaa ♥️ You Both?.', अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने 'So cute❤️ happy Birthday @akshayaddr ❤️'असे म्हटले आहे. तर काही युजर्सनी अक्षयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत 'वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी', 'चालतंय की', happy birthday, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. अक्षया आणि हार्दिक दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात.
हेही वाचलंत का?