Karan Deol Wedding 
Latest

Karan Deol Wedding : नातवाच्या लग्नात धर्मेद्र ‘यमला पगला दीवाना’… (व्हिडिओ)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल त्याची गर्लफ्रेंड दृशा आचार्यसोबत आज ( दि. १८ ) विवाह बंधनात अडकला. या शाही विवाह सोहळ्यातील ( Karan Deol Wedding )  खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, नातवाच्या लग्नाच्‍या पूर्वसंध्‍येला  बॉलिवूड अभिनेता धर्मेद्र यांनी ठेका धरला. हा व्हिडिओ सध्‍या साेशल मीडियावर व्‍हायरल हाेत आहे.

करण देओल आणि दृशा आचार्यचा मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये धुमधडाक्यात विवाह सोहळा ( Karan Deol Wedding ) पार पडला. या विवाहाला खास करून जवळचे नातेवाईक आणि बॉलिवूडमधील अनेक स्टार्संनी हजेरी लावली होती. दरम्यान, धर्मेद्र यांनीही नातवाच्या लग्नात धमाकेदार एन्ट्री केली. त्‍यांनी मान्यवरांसोबत गाण्यावर ठेका धरला. यावेळी धर्मेंद्र यांनी ब्लॅक कोट आणि व्हाईट शर्टवर लाल रंगाचा फेटा बांधला होता. या व्हिडिओमध्‍ये धमेंद्र यांच्‍याबराेबर त्‍यांच्‍या मुलगा बाॅबी देओलही थरकताना दिसत आहे.

धर्मेंद्र यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वयाच्‍या ८७ वर्षीही त्‍याचा उत्‍साह हा चाहत्‍यांना प्रेरणा देणार ठरला आहे.  नेटकऱ्यांनी त्‍यांचे भरभरून कौतुक केलं आहे. याशिवाय करण आणि दृशा यांना विवाहानिमित्त भरभरून शुभेच्छाही दिल्‍या जात आहेत.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT