बेळगाव : पुढारी वृत्तसेवा तिरुपतीचे दर्शन घेऊन बेळगावकडे परत येणाऱ्या बेळगावच्या पाच भाविकांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आंध्र प्रदेशातील किवीपल्ली जिल्ह्यातील मठपल्ली गावाजवळ पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात 11 जण जखमी झाले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील 16 भाविक क्रूजर वाहनातून तिरुपतीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येताना त्यांचा अपघात झाला. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलेही आहेत.
आंध्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी जखमींना नजीकच्या रुईया रुग्णालयात दाखल केले आहे. भाविक मूळ बेळगाव जिल्ह्यातील कोणत्या गावचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा :