kiara advani -aamir khan  
Latest

Aamir Khan : आमिरच्या नव्या जाहिरातीनंतर मोठा वाद, विवेक अग्निहोत्रीने सुनावले

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या अनेक दिवसांमध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत होता. (Aamir Khan) या चित्रपटाला बायकॉट करा, असाही सूर उमटला. आता आमिर आणखी एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. आता त्याच्या विरोधात लोक समोर आले आहेत. आमिर आणि कियारा अडवाणी यांनी भलेही एकत्र कोणताही चित्रपट केला नसेल पण हे दोन्ही स्टार्स नुकतेच एका जाहिरातीत दिसले. ही जाहिरात एका बँकेची आहे, ज्याबद्दल इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. लोकांनी या जाहिरातीवर हिंदू परंपरांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. आता या वादात चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री यांनीही उडी घेतली आहे. आमिर खानवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत विवेक अग्निहोत्रींनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. (Aamir Khan)

आमिर आणि कियाराची जाहिरात

आमिर खान आणि कियारा अडवाणी यांनी अलीकडेच एका बँकेच्या जाहिरातीत एकत्र काम केले होते. जाहिरातीत तिने नवविवाहितेची भूमिका साकारली होती. या जाहिरातीची सुरुवात दोघे त्यांच्या लग्नातून कारमधून परतले आणि विदाई समारंभाच्या वेळी वधू का रडली नाही याबद्दल चर्चा करते. माणूसही 'घर जावई' होऊ शकतो हे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. या जाहिरातीमध्ये शतकानुशतके चालत आलेली प्रथा बदलण्याचे म्हटले असून त्यामुळे विवेक अग्निहोत्री संतप्त झाल्याचे दिसतात.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे

या जाहिरातीमध्ये आमिर आणि कियारा यांनी लग्नाशी संबंधित जाहिरात काही सोशल मीडिया युजर्सना आवडली नाही. त्यांनी तिची जोरदार टीका केली. काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले की, "सामाजिक आणि धार्मिक परंपरा बदलण्यासाठी बँका कशा जबाबदार आहेत हे मला समजत नाही. मला वाटते @aubankindia ने भ्रष्ट बँकिंग प्रणाली बदलून सक्रियपणे कार्य केले पाहिजे. ते असा मूर्खपणा करतात आणि मग म्हणतात की हिंदू ट्रोल करतात. मूर्ख'.

लोकांकडून ट्रोल

विवेक अग्निहोत्रीच्या या ट्विटनंतर लोकांनी आमिर खानला आणखी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. लोक आता धर्माच्या नावावर आमिरला टोमणे मारत आहेत. याआधीही 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याबद्दल विवेक अग्निहोत्रींनी आमिरला फटकारले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT