नाशिक : साहसी क्रीडा पर्यटनासाठी नोंदणी बंधनकारक, न केल्यास होणार... | पुढारी

नाशिक : साहसी क्रीडा पर्यटनासाठी नोंदणी बंधनकारक, न केल्यास होणार...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, पॅराग्लायडिंग, बोटिंग अशा साहसी पर्यटन उपक्रमांसाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागातील साहसी उपक्रम आयोजित करणार्‍या संस्था अथवा व्यक्तींनी पर्यटन संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी कळविले आहे.

साहसी क्रीडा पर्यटनात विविध प्रकारचे साहसी पर्यटन उपक्रम राबविण्यात येतात. अशावेळी योग्य ती खबरदारी घेणे व तज्ज्ञ प्रशिक्षक असणे गरजेचे असते. उपक्रम आयोजित करताना पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना व त्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यटन संचालनालयाने नोंदणी बंधनकारक केली आहे. अधिक माहितीसाठी उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदानजवळ नाशिक 422001, दूरध्वनी क्रमांक 0253-2995464 / 2970049 किंवा ddtourism.nashik-mh@gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सरदेसाई-राठोड यांनी केले.

तर गुन्हा दाखल होणार
विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यामधील साहसी उपक्रम आयोजित करणार्‍या संस्था व व्यक्तींनी पर्यटन संचालनालयाच्या नाशिक विभागाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. प्रतिसाहसी प्रकारासाठी 500 रुपये शुल्क आहे. अर्ज सादर केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नोंदणी न करता साहसी उपक्रमांचे आयोजन केल्यास 25 हजार रुपये दंड, साहित्य जप्ती व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button