Latest

Mouni Roy : रूबिनासारखा ड्रेस घातलाय❤️; मौनीचा बॉडीकॉन तडका (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या अभिनयासोबत हॉट फोटो आणि व्हिडिओज शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या नवनवीन फॅशन सेन्समुळे चाहत्यांच्या क्रेझ निर्माण केली होती. मध्यंतरी मौनी रॉय तिच्या रिलेशनशीप आणि विवाहामुळे खूपच चर्चेत आली होती. सध्या मात्र, मौनी तिच्या कामात बिझी आहे. याच दरम्यान मौनीचा पुन्हा एकदा बोल्डनेसचा तडका चाहत्यांना पाहायला मिळाला.

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयचा पिक रंगाच्या बॉडीकॉन वनपीसमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मौनी फिटनेसोबत क्यूट आणि ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी मौनीने ब्लॅक रंगाचा चेष्मा आणि ब्लॅक रंगाची एक छोटी पर्सदेखील कॅरी केली आहे. पहिल्यांदा मौनी तिच्या कारमधून उतरले आणि ड्रेस सावरताना दिसते. यानंतर ती पॉपॉराझीच्या कॅमेऱ्यासमोर हटके पोझ देत पुढे रॅम्पवॉक करतेय. मोकळे केस. पर्स, व्हाईट कलरचे बूट, चष्मा आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

हा व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. यात मौनाच्या स्टायलिश अंदाजासोबत फिगर मेंटेन्ट केल्याचे दिसून येते आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये '#mouniroy ???'. असे लिहिले आहे. हा व्हिडिओ चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

मौनीचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Perfect body❤️', 'Stylist❤️', 'Same dress wore by rubina?', 'Stunning❤️', 'Beautiful', 'Same dress wore by rubina?', 'figure❤️? super hot❤️?', 'Cute girl', 'रूबिनासारखा ड्रेस घातलाय❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोंजीनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या व्हिडिओला आतापर्यत ३० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

मौनी रॉयने 'पती पत्नी और वो', 'दो सहेलियॉ', 'जरा नचके दिखा', 'कस्तूरी' यांसारख्या अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. मौनीला 'नागिन' या मालिकेतून वेगळी ओळख मिळाली. तर २०१८ साली 'गोल्ड' या चित्रपटाद्वारे मौनीने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार होता.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT