पुढारी ऑनलाईन डेस्क :
तीव्र भूकंपाच्या धक्क्याने आज सकाळी अफगाणिस्तान हादरले. रिश्टर स्केलवर ६.१ नोंद झालेल्या भूकंपामुळे २५५ हून अधिक जण ठार झाले असून शेकडो जण . ढिगाऱ्याखाली गार्याखाली अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती स्थानिक प्रशासनाने केली आहे.
आज पहाटे २ वाजून २४ मिनिटांनी अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला. याचा केंद्र बिंदू अफगाणिस्तानच्या खोस्त शहरापासून ४४ किलोमीटर लांब होता. भूकंपाचा धक्का अफगाणिस्तानमध्ये सुमारे ५०० किलोमीटर जाणवले. चार जिल्ह्यांमधील सर्वाधिक हानी झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २५५ हून अधिन नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहे, अशी माहिती अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते बिलाल कारिमी यांनी दिली.
अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भुकंपाचा धक्के पाकिस्तानमधील लाहौर, मुल्तान, क्वेटा शहरामध्येही जाणवले. मंगळवारी सायंकाळी पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. दरम्यान मलेशियातही भूकंपाचे धक्के जाणावले होते.
हेही वाचा :