

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या धर्तीवर काल (दि.२१) शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड करून ४० आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. आज (दि.२२) रोजी हे सर्व आमदार विशेष विमानाने गुवाहाटीला दाखल झाले आहेत. गुवाहाटी विमानतळाबाहेरून खास तीन बसेसने आमदारांना रॅडिसन हॉटेलमध्ये नेण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत प्रहार संघटनेचे बच्चू कडूही असून या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या समर्थन पत्रावर साह्य केल्या आहेत.
४० आमदारांना घेऊन रात्री उशिरा विशेष विमान सुरतवरून गुवाहाटीला निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मोहित कंभोज होते. ते पहाटे ६:३० वाजता गुवाहाटी विमानतळावर पोहचले असून याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिंदेसह आमदारांचा मुक्काम हॉटेल रॅडिसनवर आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या सोबत ४० आमदार असून आणखी १० आमदार येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा :