पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये दुर्गा पुजेच्या मंडपात भीषण आग लागली. या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक होरपळले आहेत. ही घटना रविवारी रात्री घडली असून शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना भदोही जिल्ह्यातील आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भदोहीमध्ये दुर्गा पुजेदरम्यान मंडपाला आग लागली आहे. आरतीचा कार्यक्रम सुरू असताना मंडपामध्ये सुमारे २०० लोक उपस्थित होते. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत निश्चितपणे माहिती नसुन शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत ५० हून अधिक लोक होरपळले आहेत. यापैकी ३२ जणांना उपचारासाठी वाराणसीला हलविण्यात आले आहे. एका मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या एका महिलेने सांगितले की, विजेच्या तारेतून ठिणगी पडल्याने आग लागली. या घटनेची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा :