Latest

Teacher Beating Student : शिक्षकाच्या मारहाणीत ९ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; कर्नाटकातील गदग येथील घटना

अमृता चौगुले

गदग (कर्नाटक); पुढारी ऑनलाईन : गदग (कर्नाटक) येथील सरकारी शाळेत एका अतिथी शिक्षकांनी (guest lecture) बारीक लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे सोमवारी (दि.१९) चौथी इयत्तेत शिकणाऱ्या ९ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (दि.१७) घडली होती. (Teacher Beating Student)

भरत बराकेरी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे, तो गदगच्या नरगुंड शहरातील हदली गावातील सरकारी प्राथमिक शाळेचा नऊ वर्षांचा विद्यार्थी आहे. मुत्तू हदली असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. (Teacher Beating Student)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडल्यानंतर आरोपी शिक्षक बेपत्ता असून त्याच्या अटकेसाठी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. चौकशीसाठी आरोपींनी मुलाची आई गीता बराकेरी यांनाही मारहाण केली होती. (Teacher Beating Student)

भरत मित्रांशी बोलत असताना आरोपीने त्याच्यावर पातळ लोखंडी रॉडने हल्ला केला. यानंतर मुलगा आई गीता यांच्याकडे धावत गेला. गीताने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्यावरही हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या मुलाला हुबळी येथील KIMS हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

नरगंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाचा शोध सुरू केला आहे. त्याच्या रागाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT