पुढारी ऑनलाईन डेस्क
चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार्स आहेत जे यश मिळताच आपल्या फर्स्ट बॉयफ्रेंडला एका सेकंदात डच्चू दिला. या यादीत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचा समावेश आहे. जाणून घेऊया कोण आहेत यामध्ये
अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या करिअरच्या सुरुवातीला मॉडेल होती आणि त्यावेळी ती असीम मर्चंटला डेट करायची. मात्र, नंतर यश मिळाल्यानंतर प्रियंका चोप्राने असीमला डच्चू दिला. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी असीमने प्रियांकावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती, ज्यासाठी अभिनेत्रीने त्याला कायदेशीर नोटीस पाठवली होती.
या यादीत अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाचाही समावेश आहे. तिच्या करिअरच्या सुरुवातीला ती तिचा शालेय मित्र अली दादरकर याला डेट करायची. मात्र, यश मिळाल्यानंतर आलियाने अलीला दूर केले आणि आता ती रणबीर कपूरसोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या मॉडेलिंगच्या काळात निहार पांड्याला डेट करायची. नंतर यश मिळाल्यानंतर दीपिकाने निहारला रामराम केला.
तिच्या करिअरची सुरुवात म्हणजे तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये अनुष्का शर्मा जोहेब युसूफला डेट करायची. दोघेही दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघे मुंबईत एकत्र आले पण अनुष्का यशस्वी झाली आणि झोहेबला रिकाम्या हाताने बंगळुरूला परतावे लागले.
या यादीत अभिनेता रणबीर कपूरच्या नावाचाही समावेश आहे. अभिनेता इमरान खानची पत्नी अवंतिका मलिकसोबत रणबीर बराच काळ रिलेशनशिपमध्ये होता. दोघांचे नाते ५ वर्षे टिकले आणि त्यानंतर रणबीरने अवंतिकाला डम्प केले.
हे ही वाचलं का ?