नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशात गेल्या एका दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (corona) संख्येत ३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गुरूवारी दिवसभरात २ हजार ७१० कोरोनाबाधितांची भर पडली. तर, १४ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, २ हजार २९६ कोरोनाबाधितांनी संसर्गावर मात मिळवली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.५८ टक्के नोंदवण्यात आला.
देशातील ४ कोटी २६ लाख ७ हजार १७७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर (corona) मात मिळवली आहे. तर, १५ हजार ८१४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९२ कोटी ९७ लाख ७४ हजार ९७३ डोस देण्यात आले आहेत. यातील १२ ते १४ वयोगटातील बालकांना ३.३४ कोटी पहिला डोस देण्यात आला आहे. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ३ कोटी ४० लाख २७ हजार ६२२ बूस्टर डोस देण्यात आले.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १५ कोटी ८५ लाख २२ हजार १६५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८४ कोटी ८८ लाख ७७ हजार १९६ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ६५ हजार ८४० तपासण्या गुरूवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?