जेफ बेझोस यांनी का दिला ॲमेझॉनच्या सीईओ पदाचा राजीनामा? कोण घेणार त्यांची जागा?

पुढारी ऑनलाईन डेस्क 

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी आपल्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन रिटेल कंपनीचे गेली २७ वर्षे सीईओपद सांभाळल्यानंतर अचानक बेझोस यांच्या राजीनाम्याची बातमी आली. ॲमेझॉनने आपला जागतिक व्यावसाय उत्तम प्रकारे करत असताना बेझोस यांनी राजीनामा दिल्याने त्याची चर्चा जास्त होत आहे. आता त्यांची जागा अँडी जेसी घेणार आहेत. ( why amazon CEO Jeff Bezos resigning and who will be his successor )

तिघा टिकटॉक स्टारसह कराचीत ४ जणांचा खून 

अनेक वृत्तांच्या आधारे बेझोस यांनी काही वर्षापासूनच ॲमेझॉनच्या दैनंदिन व्यवहारातून बाहेर पडण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते त्यांच्या कंपनीच्या इतर दीर्घकालीन प्रोजेक्टवर लक्ष केंद्रीत करत आहेत. यात रॉकेट तयार करणारी ब्लू ऑरिजीन कंपनीचाही समावेश आहे. 

मिया खलिफाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा 

आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात जेफ म्हणतात, 'आतापर्यंत मी ऑफिसमध्ये ट्रप डान्स करत होतो. मी होऊ घातलेल्या खांदेपालटाबाबत उत्साही आहे.' ते पुढे म्हणाले की 'मी एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून ॲमेझॉनच्या महत्वाच्या पुढाकाराशी जोडलेलो असणार. पण, मला माझा वेळ आणि शक्ती डे १ फंड, बेझोस अर्थ फंड, ब्ल्यू ओरिजीन, द वॉशिंग्टन पोस्ट आणि माझ्या इतर आवडीनिवडीसाठी वाचवायचा आहे. माझ्याकडे आताएवढी उर्जा नव्हती, ही निवृत्ती नाही. मी इतर संस्थांच्या प्रभावाबाबत अत्यंत अत्साही आहे.'

बेझोस यांचा वारसदार कोण असणार?

बेझोस हे आपले सीईओ पद अँडी जेसी यांच्याकडे सोपवण्याची दाट शक्यता आहे. ते सध्या अॅमेझॉनचे कॅश फ्लो क्लाऊड कॉम्प्युटिंग विभागाचे प्रमुख आहेत. ते अॅमेझॉनमध्ये जवळपास त्याच्या अस्तित्वापासून आहेत. जेस्सी हे बेझोस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी  आहेत. त्यामुळेच त्यांची सीईओ पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. बेझोस सीईओ असताना २००३ लाच त्यांचा शॅडो म्हणून नियुक्ती झाली होती. अॅमेझॉन वर्ल्ड सर्विसचा मूळ बिझनेस प्लॅन तयार करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news