जेफ बेझोस: २०० अब्ज डॉलरचा पल्ला गाठणारी जगातील पहिली व्यक्ती

Published on
Updated on

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

कोरोना साथीच्या प्रादुर्भाने जगभरात आर्थिक मंदीची परिस्थिती आहे. मोठ-मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्था संकटातून जात आहे. मात्र, असे असूनही ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांच्या संपत्तीत सातत्याने वाढत आहे. बुधवारी सायंकाळी त्यांनी २०० अब्ज डॉलर्स संपत्तीचा टप्पा गाठला. अशी कामगीरी करणारे ते जगातील पहिले व्यक्तीमत्म ठरले. 

जेफ बेझोस यांची संपत्ती भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केली असता त्यांच्याकडे १४,८६,६०० कोटी रुपये आहेत. २६ ऑगस्ट रोजी ॲमेझॉनच्या समभागांची किंमत प्रति शेअर २.३ टक्के वाढून ३ हजार ४२३ डॉलर झाली. त्यानंतर बेझोसची संपत्ती २०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.

२७ ऑगस्ट २०२० च्या फोर्ब्सच्या अहवालानुसार, जेफ बेझोस यांच्याकडे २०१४.६ अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. जगातील दुसरी श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांच्यापेक्षा बेझोस यांची संपत्ती जवळपास ९० अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांची संपत्ती ११६.१ अब्ज डॉलर्स आहे. The Wrap च्या अहवालानुसार नायके, पेप्सी आणि मॅकडोनाल्डसारख्या कंपन्यांपेक्षा बेझोस यांच्याकडे अधिक संपत्ती आहे. या तिन्ही कंपन्यांची मालमत्ता १३९ बिलियन डॉलरपासून १९१ बिलियन डॉलरच्या दरम्यान आहे. 

या वर्षाच्या सुरूवातीपासूनच ॲमेझॉनचा साठा ८० टक्के वाढला आहे. बेझोस यांच्याकडे ॲमेझॉनमध्ये सुमारे ११ टक्के शेअर्स आहेत. जेफ बेझोस हे अ‍ॅमेझॉन व्यतिरिक्त एअरोस्पेस कंपनी ब्लू ओरिजिन आणि अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टचेही मालक आहेत. त्याचबरोबर त्यांची अनेक खासगी गुंतवणुकीत भागीदारी आहे. 

जुलै २०१९ मध्ये बेझोस यांनी आपली पत्नी मॅकेन्झी स्कॉट हिला घटस्फोट दिला होता. त्या बदल्यात त्यांना ॲमेझॉनच्या २५ टक्के हिस्सा द्यावा लागला. ही इतिहासातील सर्वात मोठी घटस्फोटित सेटलमेंट देखील आहे. हा घटस्फोट झाला नसता तर बेझोस यांनी २०१९ मध्येच २०० अब्ज बिलियन डॉलरचा टप्पा पूर्ण केला असता, असे फोर्ब्सने म्हटले आहे.\

TikTok ला आणखी एक जबर झटका!

अमेरिकेची हेरगिरी करणारी विमाने घुसली चीनच्या हद्दीत 

दाऊदच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडला शिव्यांचा भाडिमार!

ग्रेटा थनबर्गचा NEET, JEE परिक्षांवरून भारतीय विद्यार्थ्यांना पाठिंबा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news