Heat Wave update : उत्तर भारतात तीन दिवसांमध्‍ये उष्माघाताने १०० हून अधिक जणांचा मृत्यू

Heat Wave update : उत्तर भारतात तीन दिवसांमध्‍ये उष्माघाताने १०० हून अधिक जणांचा मृत्यू
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट असून उष्‍माघाताने १०० हून अधिक जणांचा मृत्‍यू झाला आहे. ११  जूनपासून उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात ८३ लोकांचा मृत्यू झाला आहे. (Heat Wave update)

बलियामध्ये गेल्या तीन दिवसांत ५४ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे बिहारमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील बलियाच्या सरकारी रुग्णालयातच गेल्या तीन दिवसांत ५४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. बलिया सरकारी रुग्णालयाचे सीएमओ डॉ. एसके यादव यांनी सांगितले की, १५ जून रोजी रुग्णालयात १५४ रुग्ण दाखल करण्यात आले होते, त्यापैकी २३ जणांचा मृत्यू झाला. १६ जून रोजी १३७ लोकांना दाखल करण्यात आले होते, त्यापैकी २० रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर १७ जून रोजी ११ रुग्णांचा मृत्यू झाला.  मृत्यूचे कारण उष्माघात असले तरी त्याची पुष्टी झालेली नाही. ज्यांचा मृत्यू झाला ते आधीच आजारी होते आणि उष्माघात आणि उष्माघातामुळे त्यांचा आजार गंभीर झाला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Heat Wave update)

Heat Wave update : मान्सून लांबण्‍याची शक्‍यता

मान्सूनला उशीर होण्याची शक्यता असल्याने आणखी काही दिवस उष्मा कायम राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे. २० जूनपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. २१ जूननंतर काहीसा दिलासा मिळू शकेल पण तोही तात्पुरता असेल. असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते २५ जूननंतरच पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, सोमवारी (दि.२०) बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोमवारीही उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो. चक्रीवादळ बिपरजॉयने नुकतेच कच्छ, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आणि आता या वादळाच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेशात मान्सूनचे आगमन लांबत आहे. साधारणपणे, मान्सून १८ जूनच्या आसपास यूपीमध्ये दाखल होतो, परंतु यावेळी चक्रीवादळामुळे, यूपीमध्ये मान्सून काही दिवस उशीर होईल, असेही हवामान विभागाने स्‍पष्‍ट केले आहे.
हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news