omg 2
Latest
OMG 2 : अक्षय कुमारचा ओएमजी-२ आता ओटीटीवर, कधी पाहता येणार?
पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या OMG 2 ची OTT रिलीज डेट आली आहे. ओएमजी हा चित्रपट ८ ऑक्टोबर रोजी ओटीटीवर रिलीज होत आहे. नेटफ्लिक्सवर तुम्हाला हा चित्रपट पाहता येणार आहे. अमित राय यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत आहेत. (OMG 2)
संबंधित बातम्या-
अक्षयचा ओएमजी २ हा चित्रपट सनी देओलचा गदर-२ सोबत रिलीज झाल होता. दोन्हीही चित्रपटात टक्कर पाहायला मिळाली. एक मसाला एंटरटेनर होता, तर दुसरा सोशल मेसेज देणारा चित्रपट होता.
चित्रपटाचो कौतुक
बॉक्स ऑफिसवर गदर -२ ने बाजी मारली. पण ओएमजी २ देखील मागे पडला नाही. चित्रपटाला समीक्षक आणि ऑडियन्स दोन्हींकडून खूप प्रेम मिळाले. ओएमजी-२ ने बऱ्यापैकी बिझनेस केला. आता दोन महिन्यांनंतर ओएमजी-२ ओटीटीवर रिलीज होईल.

