Aftab-Shraddha Case : श्रद्धाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबला राजकारणात रस; विचारतोय गुजरात, हिमाचल निवडणुकीत…

Aftab-Shraddha Case
Aftab-Shraddha Case
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा मर्डर केसमधील आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala) दिल्ली पोलिसांच्या अख्त्यारित आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार एक माहिती समोर येत आहे की, आफताबला गुजरात, दिल्ली आणि एमसीडी (MCD Delhi) निवडणुकीत रस आहे. वाचा सविस्तर बातमी (Aftab-Shraddha Case )

गेले काही दिवस देशभरात श्रद्धा मर्डर केस प्रकरण चर्चेत आहे. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. आफताब पुनावाला  आणि श्रद्धा वालकर (27) हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मे महिन्यात आफताबने श्रद्धाचा गळा दाबून हत्या केली.  हत्येनंतर, त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या भाड्याच्या घरी 300 लिटरच्या फ्रीजमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवण्यात आले. त्यानंतर हळूहळू त्याने श्रद्धाच्या शरीराचे अवयव शहराच्या विविध भागात फेकून दिले होते.

Aftab-Shraddha Case : सुरक्षा रक्षकांशी करतो चर्चा 

गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) त्याचबरोबर दिल्ली महानगरपालिकेचीही निवडणूक झाली आहे. 8 डिसेंबर रोजी येणाऱ्या निवडणुकींचा निकाल लागणार आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार आफताब ज्या खोलीत राहतो त्याबाहेरील सुरक्षा रक्षकांशी तो बोलत असतो. त्याने सुरक्षा रक्षकांना गुजरात, हिमाचल प्रदेश आणि एमसीडी (MCD Delhi) निवडणुकी संदर्भात विचारत असतो. या सुरक्षा रक्षकांना असेही विचारले आहे की, निवडणुकीत कोण जिंकेल, कोणाचं सरकार येणार.

आफताबच्या उत्तरांच्या विश्लेषणासाठी आता मानसशास्त्रज्ञांची मदत घेणार

पॉलिग्राफ आणि नार्को चाचण्यांत आफताब पूनावालाने दिलेल्या काही उत्तरांमुळे पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असून आफताबच्या वर्तणूक व उत्तरांच्या विश्लेषणासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेण्याची तयारी केली आहे. आफताबच्या मागील आठवड्यात पॉलिग्राफ व नार्को चाचण्या झाल्या होत्या. या चाचण्यांचे विश्लेषण करण्याचे काम सुरू असून त्यातील बारीक बारीक मुद्दे पोलीस तपासून पाहात आहेत.

या दोन्ही चाचण्यांत काही प्रश्नांना आफताबने अत्यंत शांतपणे व संतुलितरीत्या इतकी सारखी उत्तरे दिली आहेत की, पोलिसांना तो पक्की पूर्वतयारी करून आला होता की काय, असा संशय आहे. त्यामुळे आफताबचे वर्तन व उत्तरांचे विश्लेषण करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे. या आधीच्या अनेक चौकशांमधून आफताबने दिलेली उत्तरे व दोन चाचण्यांत दिलेली उत्तरे यांची पडताळणी सुरू आहे. काही ठिकाणी आपण मनोरुग्ण असल्याचे भासावे यासाठी विचित्र उत्तरे आफताबने दिली असावीत, असाही पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news