Ayushmann Khurrana : आयुष्यमान खुरानाचा ‘हा’ चित्रपट १८ वर्षांवरील प्रेक्षकांनाचं पाहता येणार; मिळाले ‘ए’ सर्टिफिकेट

Ayushmann Khurrana : आयुष्यमान खुरानाचा ‘हा’ चित्रपट १८ वर्षांवरील प्रेक्षकांनाचं पाहता येणार; मिळाले ‘ए’ सर्टिफिकेट
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि जंगली पिक्चर्स (Junglee Pictures) या दोघांना 'बधाई हो' आणि 'बरेली की बर्फी' या सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. हे दोघे 'डॉक्टर जी' (Doctor G Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आयुष्यमान खुरानाची एक प्रतिभावन अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख आहे. तो अत्यंत संवेदनशील आणि समाजाचे प्रबोधन करणारे चित्रपटांची निवड करतो अशी त्याची ओळख आहे. त्याच्या शिवाय असे चित्रपट करण्याचे धाडस इतर कोणताही अभिनेता शक्यतो करण्याचे दाखवत नाही. पण, तो त्याच्या संवेदनशील चित्रपटातून देखील प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन करतो. यामुळे त्याचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा एक वेगळा विषय घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मध्ये तो स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टराच्या भूमिकेत आहे. एक पुरुष डॉक्टर जो स्त्री रोगतज्ज्ञ आहे त्याच्याकडे समाज कशा पद्धतीने पाहतो आणि स्वत: अशा डॉक्टरांना कशा अडचणींना समोरे जावे लागते हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. हा एक विनोदी पट आहे. पण, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने 'ए' सर्टीफिकेट दिले आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील प्रेक्षकांनाच हा चित्रपट पाहता येणार आहे.

आपल्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी आयुष्यमान (Ayushmann Khurrana) नेहमी चर्चेत असतो. आता त्याच्या 'डॉक्टर जी' या आगामी चित्रपटाद्वारे आयुष्मान खुराणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने 'ए' सर्टीफिकेट दिले आहे. आयुष्यामानने विकी डोनरमध्ये शुक्राणू दान करणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली होती. शुभ मंगल सावधान मधून त्याने शारीरिक संबधांवेळी समस्या येणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली होती. शुभ मंगल जादा सावधानमध्ये त्याने 'गे' अर्थात समलैगिंक असणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली होती. आर्टीकल १५ मध्ये त्याने एका पोलिस प्रमुखाची भूमिका साकारली होती आणि यामध्ये जातीय व्यवस्थेवर भाष्य करण्यात आले होते. अंधाधून मध्ये त्याने आंधळ्या कलाकाराची भूमिका साकारली होती. अशा विविधांगी भूमिका साकरत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'डॉक्टर जी' हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे, ज्यामध्ये एका स्त्री रोगतज्ज्ञ पुरुष डॉक्टरचा प्रवास दाखविण्यात आला आहे. हा प्रवास अगदी वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रीरोग विभागात शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यापासून सुरु होतो. या चित्रपटात काही बोल्ड दृष्ये व बोल्ड संवाद देखील आहेत. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि स्वत: आयुष्यमान खुराणा यांनी यामध्ये कोणताही बदल न करण्याचा व हा संवेदनशील विषय अशा विडंबनात्मक पद्धतीने प्रेक्षकांसमोर जावा अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे चित्रपटाला मिळालेल्या 'ए' प्रमाणपत्राबाबत त्यांना कोणताही आक्षेप नाही. याद्वारे कथानकाशी कोणतीही तडजोड न करण्याची त्यांची भूमिका आहे.

या बाबत जंगली पिक्चर्सच्या सीईओ अमृता पांडे म्हणाल्या, हा चित्रपट बोल्ड आणि मनोरंजनाने भरलेला आहे, तरीही स्टिरियोटाईप तोडतो, ज्याची अपेक्षा खर्‍या आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाकडून केली जाऊ शकते.

दिग्दर्शक अनुभूती कश्यप म्हणतात, 'हा एक कॉमेडी ड्रामा आहे, जो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतो. हा चित्रपट अधिककाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल'. हा चित्रपट १४ ऑक्टोंबर रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news