

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अॅडल्ट फिल्मस्टार इमिली विलिस हिला गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. सध्या इमिली कोमात असून ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे. इमिली मृत्यूशी झुंज देत असून तिच्याबद्दल वाईट बातमी येऊ शकते, असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. (Emily Willis)
हृदविकाराचा झटका आल्यानंतर इमिलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण तिच्या आरोग्यात कसलीच सुधारणा झालेली नाही. तिचे वडील मायकेल विलिस म्हणाले, "इमिली सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही."
ओव्हर डोसमुळे इमिलीला हृदयविकाराचा झटका आला असे म्हटले जात होते, पण तिच्या वडिलांनी हे वृत्त नाकारले आहे. (Emily Willis)
इमिली विलिस अॅडल्ट फिल्म स्टार आहे आणि सोशल मीडियावर तिला मोठी फॉलोविंग आहे. तिने अमलीपदार्थांचे अतिसेवन केले होते, त्यामुळे तिला पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. पण येथे तिला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर ती कोमात गेली आणि तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होऊ शकलेली नाही.
हेही वाचा