पिंपरी-चिंवचड पाण्याचा प्रश्न मिटणार: दहा दिवसांत मिळणार 100 एमएलडी अतिरिक्त पाणी; प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी-चिंवचड पाण्याचा प्रश्न मिटणार: दहा दिवसांत मिळणार 100 एमएलडी अतिरिक्त पाणी; प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंवचड शहराला येत्या 10 दिवसांत 100 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, असा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी गुरुवारी २ जून रोजी केला आहे.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी चिखली येथील 100 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, साधना मळेकर, किसन बावकर, दिनेश यादव, नीलेश नेवाळे, जितेंद्र यादव आदी उपस्थित होते.

पाहणीनंतर आ. लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. योजनेचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. आयुक्त पाटील म्हणाले की, आंद्रा धरणातून उचलण्यात येणार्‍या 100 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या 10 ते 12 दिवसांत पाणी शहरवासीयांना मिळणार आहे.

एकनाथ पवार म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणीपुरवठ्याचे अन्य स्त्रोत निर्माण करणे गरजेचे होते. भाजपचे तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंद्रा व भामा आरखेड धरणातील पाणीसाठा फेरआरक्षणास मान्यता देत सकारात्मक निर्णय घेतला. पालिकेतील भाजपाच्या सत्ताकाळात आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेडमधून 167 एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवडला मिळण्यासाठी प्रकल्पाला मंजुरी दिली. कोरोना व लॉकडाऊनच्या परिणामामुळे नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यात प्रशासनाला अडचणी आल्या. अखेर, सर्व अडचणींवर मात करीत प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकर आता पाण्यासाठी स्वयंपूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news