Latest
अभिनेत्री रविना टंडनला पितृशोक; रवी टंडन यांचे मुंबईत निधन
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडिल चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन झाले. मुंबईत शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वडिलांचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.
रवी टंडन चित्रपटसृष्टीतील एक मोठा चेहरा होते. त्यांचा जन्म आग्रा येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. रवी यांनी वीणा टंडनयांच्याशी लग्न केले. त्यांना राजीव आणि रवीना अशी मुले आहेत.
१९६० मध्ये लव इन शिमला या फिल्ममधून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटाचे त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. यामध्ये 'खेल खेल में', 'अनहोनी', 'नजराना', 'मजबूर', 'खुद-दार' आणि 'जिंदगी' चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचलं का?

